नाशिक येथील जवान अमोल विलास शिंदे यांचे अपघाती निधन; अन्य दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 11:46 IST2021-09-19T11:46:07+5:302021-09-19T11:46:46+5:30
सिन्नर -ठाणगाव रस्त्यावर आटकवडे शिवारात हा अपघात झाला

नाशिक येथील जवान अमोल विलास शिंदे यांचे अपघाती निधन; अन्य दोन जण जखमी
नाशिक: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जवान अमोल विलास शिंदे (वय-24) यांचे शनिवारी राञी नऊ वाजेच्या दरम्यान अपघाती निधन झाले असून अन्य दोन जण जखमी आहे.
सिन्नर -ठाणगाव रस्त्यावर आटकवडे शिवारात हा अपघात झाला. चार-पाच दिवसापूंर्वी अमोल सुट्टीवर आलेले होते. वैयक्तिक काम आटोपून मोटारसायकलने सिन्नर येथून आपल्या मिञासोबत ठाणगावकडे निघाला असतांना हा अपघात झाला. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.अमोल हे सध्या पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत होते. ते अविवाहीत असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे .अपघातात आमोल सोबत आणखी दोन किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या वर सिन्नर येथे उपचार सुरु आहे. अपघातात मृत्यू पडलेल्या सैन्य दलातील जवानाचे शवविच्छेदन सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या अपघाताचे वृत्त गावात पसरतात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.