वृध्द आईचा मुलाच्या टपरीसमोरच अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:46 IST2018-10-03T17:45:44+5:302018-10-03T17:46:34+5:30

चांदवड- येथील पेट्रोल पंपावर मुलाची टपरी असून त्या टपरीतील देव्हाऱ्यात पुजा साहित्य व फुले घेऊन जाणाºया वृध्देचा मारुती रिट्झ या कारने धडक दिल्याने दुदैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Accidental death in front of an old mother's child | वृध्द आईचा मुलाच्या टपरीसमोरच अपघाती मृत्यू

वृध्द आईचा मुलाच्या टपरीसमोरच अपघाती मृत्यू

ठळक मुद्देमारुती रिट्झ कारने जानकाबाई यांना जोरदार धडक दिली.



चांदवड- येथील पेट्रोल पंपावर मुलाची टपरी असून त्या टपरीतील देव्हाऱ्यात पुजा साहित्य व फुले घेऊन जाणाºया वृध्देचा मारुती रिट्झ या कारने धडक दिल्याने दुदैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुबंई आग्रारोडच्या कडेला राजु ठोंबरे यांची टपरी असून आई जानकाबाई झिपरु ठोंबरे (७०) रा. गाडगेमबाबा चौक, चांदवड या दररोज सकाळी पुजेचे ताट घेऊन टपरीतील देवाला नमस्कार करण्यास जात असे नित्याप्रमाणे त्या सकाळी टपरीकडे जात असतांना मुंबईआग्रारोडवरुन जात असणारी मारुती रिट्झ कार क्रमांक एम.एच. २३ / ए.डी.२३०९ हिने जानकाबाई यांना जोरदार धडक दिली.त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत म्हणून घोषीत केले याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक मोरे करीत आहेत.

Web Title: Accidental death in front of an old mother's child

टॅग्स :Accidentअपघात