विंचूरजवळ शिवशाही व टॅँकरला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:07 IST2018-09-15T16:07:47+5:302018-09-15T16:07:56+5:30
२० प्रवाशी जखमी : पाच जणांची प्रकृती गंभीर

विंचूरजवळ शिवशाही व टॅँकरला अपघात
नाशिक : नाशिक - औरंगाबाद महामार्गावर विंचुर नजिक औद्योगिक वसाहती जवळ आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस ( क्रमांक ०४ जेके २८४४) आणि टॅँकर (क्रमांक ०४ जीसी ९०७७) यांच्यात भीषण अपघात होऊन २० प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातात पाच जण अत्यवस्थ असून जखमींना निफाड व नाशिक रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. शिवशाहीमध्ये एकूण ४५ प्रवाशी होते. इतर प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. शिवशाही व टॅँकर यांच्यात झालेला अपघात इतका भीषण होता की बसने दोनदा पलट्या मारल्या. सदर टॅँकर पेट्रोलने भरलेला आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिवशाही बस नाशिकहून औरंगाबाद कडे जात होती तर पेट्रोल टँकर येवल्याहून निफाड कडे जात असताना टँकरचा मागचा टायर फुटल्याने टॅँकर दुभाजक ओलांडून शिवशाही बसवर आदळला. त्यामुळे बस पलटी खाऊन नाल्यात गेली.