शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

विंचूरजवळ अपघात; दोन ठार, १९ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:51 IST

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर औद्योगिक वसाहतीसमोर शनिवारी दुपारी डिझेल वाहतूक करणाऱ्या टॅँकरचा टायर फुटल्याने टॅँकर शिवशाही बसवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार, तर १९ प्रवासी जखमी झाले. हरी ठाकरे (रा. औरंगाबाद) तसेच लता श्यामराव मिलत (६१, रा. गंगापूररोड, नाशिक) अशी ंमृतांची नाव आहे. जखमींना निफाड तसेच नाशिक येथील रुग्णालयालयात दाखल करण्यात आले आहे.

विंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर औद्योगिक वसाहतीसमोर शनिवारी दुपारी डिझेल वाहतूक करणाऱ्या टॅँकरचा टायर फुटल्याने टॅँकर शिवशाही बसवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार, तर १९ प्रवासी जखमी झाले. हरी ठाकरे (रा. औरंगाबाद) तसेच लता श्यामराव मिलत (६१, रा. गंगापूररोड, नाशिक) अशी ंमृतांची नाव आहे. जखमींना निफाड तसेच नाशिक येथील रुग्णालयालयात दाखल करण्यात आले आहे.बस (क्र. एमएचजे के २८४४) नाशिकहून औरंगाबादकडे जात असताना विंचूर औद्योगिक वसाहतीजवळ मनमाडहून निफाडकडे जाणाºया टॅँकरचे (क्र. एमएच ०४ जेसी ९०७७) टायर फुटल्याने टॅँकर दुभाजक तोडून बसवर जाऊन आदळला. वेगात असलेल्या बसच्या चालकाने बस वेगाने पुढे नेत रस्त्याच्या खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. (पान ७ वर)मात्र तरीही टॅँकर शिवशाही बसच्या मागील भागावर आदळल्याने दोन तीन पलटी घेऊन बस रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात कोसळली. तसेच पुढे जाऊन टॅँकरही रस्त्यालगत उलटला.अपघातामुळे भीषण आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर बस उलटल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकच हाहाकार उडाला. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते.विंचूरचे उपसरपंच नानासाहेब जेऊघाले, पांडुरंग राऊत, अनिल विंचूरकर, विष्णुनगरचे सरपंच किशोर मवाळ यांच्यासह नागरिकांनी मदतकार्य करीत जखमींना बाहेर काढले. अपघातातील गंभीर जखमींना निफाड तसेच नाशिक येथील शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.काही जखमींवर येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केले. अपघाताची माहिती कळताच पंचक्र ोशीतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.जखमींची नावे-गणेश बाळासाहेब पारखे, बस चालक(औरंगाबाद),रणजितसिंह चव्हाण , वाहक (औरंगाबाद),शारदा शेषनाथ यादव,(अंबड, नाशिक), शेषनाथ बिंदश्वर यादव (अंबड,नाशिक),बाळू भिकाजी साळुंके ,(विंचूर), लक्ष्मण श्रावण बोरसे,(औरंगाबाद ),निशांत शशिकांत पाटील(कुर्ला, मुंबई),लोकमतचे पत्रकार अ‍ॅड.शेखर देसाई (लासलगाव ),उत्तम दगू जाधव (पिंपळगाव ), रु पसिंग कुसराम राजपुरोहित (विंचूर), अमोल बबन वाघ ( पिंपळद नाशिक ),मयूर गरिबे ( जुन्नर,औरंगाबाद ), वैशाली जितेंद्र घोडके (पिंपळगाव ),परशराम विष्णू जाधव (वाकद शिरवाडे ).इन्फो: पेट्रोल टॅँकरचा टायर फुटल्याने शिवशाही बसवर पेट्रोल टॅँकरवर आदळून बाजुला उलटला. टॅँकरमध्ये इंधन असूनही दोन पलटी घेऊनही सुदैवाने काही अघटीत घटना घडली नाही. नाशिक औरंगाबाद महामार्गावर भरवस फाट्यापासून पिंपळसपर्यंत मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे लहान मोठे अपघात वाढले असून संबंधित विभागाकडे दुरु स्तीची वारंवार मागणी करु नही त्याची दखल घेतली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.या अपघातात ‘लोकमत’चे लासलगावचे वार्ताहर शेखर देसाई हे जखमी झाले आहेत. देसाई निफाडहून लासलगावकडे येण्यासाठी शिवशाही बसमध्ये बसले होते. त्यांना छातीला व मानेला मुका मार लागला असून, निफाड येथील प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथील खासगी रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकDeathमृत्यू