शहापूरजवळ अपघात : अंत्यविधीसाठी जाताना नाशिकच्या एकाच कुटुंबातील चौघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 21:38 IST2019-12-02T21:37:26+5:302019-12-02T21:38:34+5:30
सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तवेरा गाडीचे टायर फुटल्याने तवेरा आयशर गाडीवर जाऊन आदळली

शहापूरजवळ अपघात : अंत्यविधीसाठी जाताना नाशिकच्या एकाच कुटुंबातील चौघे ठार
नाशिक : मुंबईला अंत्यविधीसाठी जात असताना शहापूरजवळ झालेल्या अपघातात नाशिकच्या चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.अपघातातमृत्यूमुखी पडलेले सातपूर कॉलनीतील एकाच कुटुंबातील आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भवर कुटुंबीय नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी तवेरा गाडीने ठाण्याला चालले होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तवेरा गाडीचे टायर फुटल्याने तवेरा आयशर गाडीवर जाऊन आदळली.या अपघातात सातपूर कॉलनीतील रहिवासी तथा मायको कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश दत्तात्रय भवर (७०) त्यांची भावजई संगीता राजेंद्र भवर (४७), चुलत भाऊ नाशिकरोड येथील रहिवासी बाळासाहेब भवर (६०), चुलत बहीण सुमन ठोके (५३ रा.सिडको) या चौघांचा मृत्यु झाला तसेच उर्वरित चौघे जखमी आहेत. अपघाताचे वृत्त समजताच सातपूर कॉलनीतील राजेंद्र भावसार, लोकेश कटारिया, सोमनाथ पाटील, चारुदत्त आहेर, जगदीश दानेज, किरण पगारे,गणेश धात्रक, सारंग जाईल, अतुल पटेल आदींसह मित्रमंडळींनी शहापूरकडे धाव घेतली आहे.