मंगरूळ टोलनाक्याजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:50 IST2019-07-19T00:48:49+5:302019-07-19T00:50:48+5:30
चांदवड : चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याजवळ नाशिक कडून मालेगाव कडे जाणाऱ्या डपंरने काळी पिवळी जीपला धडक दिल्याने काही जण किरकोळ जखमी झाले तर जीपचे नुकसान झाले

मंगरूळ टोलनाक्याजवळ अपघात
चांदवड : चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याजवळ नाशिक कडून मालेगाव कडे जाणाऱ्या डपंरने काळी पिवळी जीपला धडक दिल्याने काही जण किरकोळ जखमी झाले तर जीपचे नुकसान झाले याबाबत डपर चालक खबर न देताच घटनास्थळी डपंर सोडूून पळून गेला.
याबाबत शांताराम कारभारी बेडसे रा. टेहरे ता. मालेगाव काळी पिवळी चालक यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. डपर क्रमांक (एम.एच.१५/सी.के. ४००१) वरील चालकांने नाशिककडून मालेगावकडे जात असतांना भरधाव वेगाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन पुढे जाणारी काळी पिवळी जीप क्रमांक (एम.एच.१५ /ई १५७३) हीस क्लिनर साईडने धडक दिल्याने अपघात झाला. यात शांताराम बेडसे व जीपमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले तर डपंर चालक अपघाताची खबर न देताच पळून गेला.