मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:53 AM2018-06-17T00:53:21+5:302018-06-17T00:53:21+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावरील माणिकखांब शिवारात शनिवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता कारचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला.

 Accident on Mumbai-Agra highway; One killed | मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; एक ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; एक ठार

googlenewsNext

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील माणिकखांब शिवारात शनिवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता कारचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला.  शनिवारी दुपारच्या सुमारास हरजिंदर सिंग व सोनाली सिंग हे दांपत्य ह्युंदाई कारने (एपी २८, जेपी ५३६४) मुंबईहून नाशिककडे  जात असताना माणिकखांब गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटली.  या अपघातात चालक हरजिंदर सिंग यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सोनाली गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा  रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना देवळाली कॅम्प येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  घोटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धर्मराज पारधी पुढील तपास करीत  आहेत. दरम्यान, या अपघातात ठार झालेला युवक सैनिक असल्याचे समजते.

Web Title:  Accident on Mumbai-Agra highway; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात