Accident: मालेगावच्या वऱ्हाडाच्या बसला अपघात; वृद्धेसह तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:01 IST2022-12-02T15:00:12+5:302022-12-02T15:01:03+5:30
Accident: लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला भडगाव ता.(साक्री) बारीत अपघात झाला या भीषण अपघातात वृद्धेसह एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुमारे १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Accident: मालेगावच्या वऱ्हाडाच्या बसला अपघात; वृद्धेसह तरुणीचा मृत्यू
- अतुल शेवाळे
मालेगाव (नाशिक) - तालुक्यातील चिंचवे(गा) येथून साक्री येथे लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला भडगाव ता.(साक्री) बारीत अपघात झाला या भीषण अपघातात वृद्धेसह एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुमारे १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृत व जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिंचवे(गा) येथील संदीप बाळू साळवे यांच्या मुलीचे साक्री येथे लग्न होते. वऱ्हाड सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास साक्री कडे रवाना झाले होते. भडगावबारीत चालक दीपक आहिरे याचे स्कूल बस क्रमांक एम एच ४१एबी ९८०५ वरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात मकुबाई बारकू ह्यालीज(६०) रा. करजगव्हाण व मयुरी विकास बोरसे (१२) रा शिर्डी यांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ ते २९ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही गंभीरित्या जखमी झालेल्या वऱ्हाडीना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वऱ्हाडी मंडळीने तातडीने जखमी व मृतांना सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. या अपघातात मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले आहेत.