खामखेडा-पिळकोस रस्त्यावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:53 IST2020-07-20T20:48:20+5:302020-07-21T01:53:42+5:30
खामखेडा : खामखेडा-पिळकोस रस्त्यावर शिवाजीनगरजवळील वळणावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री घडली.

खामखेडा-पिळकोस रस्त्यावर अपघात
खामखेडा : खामखेडा-पिळकोस रस्त्यावर शिवाजीनगरजवळील वळणावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री घडली.
कळवणकडून सटाण्याच्या दिशेने येणाºया कारला (क्र. एमएच ३० एझेड ०५०८) शिवाजीनगर जवळील वळणावर समोरून येणाºया अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली. त्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून, कारचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.