कळवण महामार्गावर अपघात खामखेडा येथील तरु ण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 18:34 IST2019-01-27T18:34:24+5:302019-01-27T18:34:47+5:30

खामखेडा : येथील राज्य क्र मांक १७ महामार्गावर शेवाळेवस्ती जवळ झालेल्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच ४१ व्ही ३२४०) कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात खामखेडा येथील तरुण गोकुळ मोरे ठार झाला.

Accident on Kalwan highway killed at Khamkhada | कळवण महामार्गावर अपघात खामखेडा येथील तरु ण ठार

कळवण महामार्गावर अपघात खामखेडा येथील तरु ण ठार

ठळक मुद्देरस्त्याच्या कडेला फेकला जाऊन जबर जखमी

खामखेडा : येथील राज्य क्र मांक १७ महामार्गावर शेवाळेवस्ती जवळ झालेल्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच ४१ व्ही ३२४०) कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात खामखेडा येथील तरुण गोकुळ मोरे ठार झाला.
शनिवारी रात्री ८.३० वाजता ही दुर्घटना घडली. कळवणकडून येणाऱ्या लखमापूर ता. बागलाण येथील शक्ती दळवी यांच्या स्विफ्ट डिझायर कार व व खामखेडा येथून काळखडीकडे जाणारा मोटरसायकलस्वार गोकुळ मोरे यांच्यात शेवाळेवस्तीवरील वळणावर समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये मोटरसायकलस्वार गोकुळ दादाजी मोरे (१७) रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन जबर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले. त्याच्यावर उपचारसुरु असताना रात्री अकरा वाजता त्याचा मृत्यू झाला. अपघातात मोटरसायकलचा चेंदामेंदा झाला झाला आहे.
मोटरसायकलस्वार गोकुळ हा येथील शेतकरी दादाजी सदाशिव मोरे यांचा एकुलता एक मुलगा तर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक मोरे यांचा पुतण्या होता. वडीलांना शेती कामात मदत होईल यासाठी त्याने दहावी नंतर शिक्षण सोडले होते.
देवळा पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. गावचा तरुण व मोरे यांचा एकुलता एक होतकरू मुलगा अपघातात ठार झाल्याने गावावर शोककळा पसरली.
(फोटो २७ मोरे)

Web Title: Accident on Kalwan highway killed at Khamkhada

टॅग्स :Accidentअपघात