Accident: मालेगावजवळ भाविकांच्या टेम्पोला अपघात, सहा जणांचा मृत्यू, ४ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 22:36 IST2022-03-06T21:50:46+5:302022-03-06T22:36:56+5:30
Accident News: मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविकांच्या टेम्पोला परत जाताना गिगाव फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाले असून ४ जण जखमी झाले आहेत.

Accident: मालेगावजवळ भाविकांच्या टेम्पोला अपघात, सहा जणांचा मृत्यू, ४ जण जखमी
नाशिक - मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविकांच्या टेम्पोला परत जाताना गिगाव फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाले असून ४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर अपघात रविवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविक मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. खंडेराव महाराजांचे दर्शन व गोंधळाचा कार्यक्रम आटोपून भाविक पुन्हा आपल्या गावाकडे निघाले होते. गिगाव फाट्यावर आल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या पिकअप आणि टेम्पोत जोरदार धडक झाली. यात टेम्पो पलटी झाला. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना टेम्पोतून बाहेर काढून तालुका पोलिसांना याची खबर दिली. तात्काळ घटनास्थळी पोलिसांसह रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले.