जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धेत अबू खान प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:06 IST2019-02-04T17:04:23+5:302019-02-04T17:06:43+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेतील २०० मीटर धावणे (लहान गट) या क्रीडा प्रकारात सिन्नर तालुक्यातील मुसळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाचवीतील अबू सलीम खान या विद्यार्थ्यांने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धेत अबू खान प्रथम
नाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयममध्ये नुकत्याच जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., शिक्षण सभापती यतीन पगार, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचे हस्ते अबू सलीम याचा गौरव करण्यात आला. दरवर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडत असतात. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. तसेच आपले कसब दाखविण्यासाठी एक चांगले व्यासपीठ या निमित्ताने अध्यक्ष चषक स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी केंद्र, बीट, तालुका, जिल्हास्तरावर या स्पर्धा होतात. यातूनच विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा होते व उत्कृष्ट गुणवत्ता शोध मोहीम पार पडते. मुसळगाव शाळेतील अबु सलीम खान या विद्यार्थ्यांने हे सर्व टप्पे पार करत जिल्हास्तरावर नैपुण्य संपादन केले. त्याला वर्गशिक्षक विशाखा वर्पे यांचे मार्गदर्शन लाभले.