परराज्यातील सुमारे ८५ लाखांचा मद्य साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 00:50 IST2021-11-24T00:50:09+5:302021-11-24T00:50:35+5:30
नाशिक-वणीरोडवरील कृष्णगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वाहन तपासणीच्या वेळी दिंडोरी येथे परराज्यातील ८४ लाख ७८ हजाराचा मद्यसाठा सापडला असून पोलिसांनी वाहन चालकास मुद्देमालासह ताक्यात घेतले आहे

परराज्यातील सुमारे ८५ लाखांचा मद्य साठा जप्त
नाशिक : नाशिक-वणीरोडवरील कृष्णगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वाहन तपासणीच्या वेळी दिंडोरी येथे परराज्यातील ८४ लाख ७८ हजाराचा मद्यसाठा सापडला असून पोलिसांनी वाहन चालकास मुद्देमालासह ताक्यात घेतले आहे.या बाबत समजलेली माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (दि.२२) नाशिक-वणीरोड वरील कृष्णगाव (ता. दिंडोरी) येथे वाहन तपासत असताना एका ट्रकमध्ये रॉयल चॅलेंज व्हिस्की ७५० मिली. च्या ९६० बाटल्यांचे (८० बॉक्स), मॅकडॉवेल नं. १ व्हिस्की ७५० मि.ली.च्या १२०० बाटल्यांचे (१०० बॉक्स), १८० मि.ली.च्या २४०० बाटा्या (५० बॉक्स, ऑल सिझन व्हिस्की ७५० मि.ली.च्या २६४० बाटल्या (२२० बॉक्स व दोन मोबाईल, ट्रक (डी डी ०१ ए ९५१९) असा सुमारे ८४,७८,००० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी वाहन चालक विष्णू बगडावत राम बतशनोई (३४, रा. रासीसर बडा बास, नौखा, जि. बिकानेर, राजस्थान) याला मुद्देमालासह ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.