प्रेमसंबंधातून युवतीवर धारदार शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 01:35 IST2022-06-04T01:34:45+5:302022-06-04T01:35:06+5:30

देवी चौक येथील एका सराफाच्या दुकानातील युवतीने प्रेमसंबंधातून बोलणे बंद केल्याने संतप्त प्रेमवीराने महिलेस शिवीगाळ करून मारहाण करत धारधार वस्तूने हातावर वार करीत दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

A young woman was attacked with a sharp weapon during a love affair | प्रेमसंबंधातून युवतीवर धारदार शस्त्राने वार

प्रेमसंबंधातून युवतीवर धारदार शस्त्राने वार

नाशिकरोड : देवी चौक येथील एका सराफाच्या दुकानातील युवतीने प्रेमसंबंधातून बोलणे बंद केल्याने संतप्त प्रेमवीराने महिलेस शिवीगाळ करून मारहाण करत धारधार वस्तूने हातावर वार करीत दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती देवीचौकातील एका सराफाच्या दुकानात कामाला आहे. तिने हा प्रकार घडल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता बुधवारी दुपारच्या सुमारास दुकानात काम करीत असताना संशयित प्रियकर शुभम अरुण घोलप (२२, श्रीकृष्ण नगर, जेलरोड) हा दुकानाजवळ आला. पीडितेने काही दिवसांपासून बोलणे बंद केले होते. त्याविषयी शुभमने विचारणा करीत मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर कटरसारख्या धारदार वस्तूने युवतीच्या हातावर वार करून दुखापत केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A young woman was attacked with a sharp weapon during a love affair