नाशिकमध्ये ज्येष्ठ व्यावसायिकाने राहत्या घरात झाडली स्वतःवर गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 17:51 IST2022-07-23T17:50:23+5:302022-07-23T17:51:19+5:30
Nashik : शनिवारी (दि.23) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात बेडरूममध्ये स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नाशिकमध्ये ज्येष्ठ व्यावसायिकाने राहत्या घरात झाडली स्वतःवर गोळी
नाशिक : आडगाव शिवारातील हनुमाननगर येथे असलेल्या पार्क साईड इमारतीत राहणाऱ्या रोशनलाल ओमप्रकाश गोयल (60) यांनी शनिवारी (दि.23) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात बेडरूममध्ये स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
गोयल हे दोघे पती-पत्नी राहत असून गोयल काही दिवसांपूर्वी व्यापार करायचे मात्र आता ते घरीच होते गोयल आणि त्यांची पत्नी या दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याने त्यातूनच गोयल यांनी बंदुकीतून उजव्या कानाच्या वर डोक्याजवळ स्वतः गोळी झाडून घेतली असे पोलिसांनी सांगितले.
घटनेचे वृत्त कळतात घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख पोलीस पथकाने धाव घेतली होती.