कलानगर परिसरात खेचली महिलेची सोनसाखळी; दुचाकीस्वार चोरट्यांची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2023 15:33 IST2023-05-08T15:32:25+5:302023-05-08T15:33:57+5:30

सोनसाखळी चोरी प्रकरणी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ महालक्ष्मी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या लता शाम साबळे यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

A gold chain worth Rs 90,000 was stolen from a woman's neck by two thieves on a two-wheeler in dindori road nashik | कलानगर परिसरात खेचली महिलेची सोनसाखळी; दुचाकीस्वार चोरट्यांची धूम

कलानगर परिसरात खेचली महिलेची सोनसाखळी; दुचाकीस्वार चोरट्यांची धूम

- संदीप झीरवाळ 

नाशिक-  दिंडोरी रोडवरील कलानगर परिसरातून रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना रविवारी (दि.७) दुपारी घडली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोनसाखळी चोरी प्रकरणी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ महालक्ष्मी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या लता शाम साबळे यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या दरम्यान, साबळे या आठवले - जोशी शाळेजवळील कलानगर कॉलनी रस्त्याने जात असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी साबळे यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून पलायन केले.त्यामुळे साबळे यांनी म्हसरूळ पोलिस ठाणे गाठत पोलिसांना घडलेला प्रकार सांगत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीस्वाप चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A gold chain worth Rs 90,000 was stolen from a woman's neck by two thieves on a two-wheeler in dindori road nashik