झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

By अझहर शेख | Published: February 3, 2024 09:32 PM2024-02-03T21:32:27+5:302024-02-03T21:33:27+5:30

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची पिडितेची तक्रार

A case of rape has been registered against the Jhumka Wali Poran fame actor in Nashik | झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक : अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं...’या यु-ट्यूबवरील गाण्याने प्रचंड लोकप्रियता मागील वर्षी मिळविली होती. हे गाणे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे; मात्र ते एका वेगळ्या कारणाने. या गीतामधील अभिनेता संशयित विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत यांच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यु-ट्युब चॅनलद्वारे गीते प्रसारित करत पिडितेसोबत ओळख वाढवून संशयित कुमावत याने ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमीष दाखवून मागील पाच महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात शारिरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा कुमावतविरूद्ध दाखल केला आहे. पिडितेसोबत शूटिंगदरम्यान कुमावत याची ओळख झाली होती.

सातपूर येथील म्हाडा कॉलनीत राहणारा संशयित विनोद उर्फ सचिन कुमावत वास्तव्यास आहे. पिडितेसोबत झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले.

कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते 17 जानेवारी२०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी पिडित युवतीला घेऊन जात शारीरिक अत्याचार केले. तसेच पीडित युवतीने पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून मारहाण करत लग्नास नकार दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित कुमावतविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि.३) रात्री उशीरापर्यंत संशयित कुमावत यास पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नव्हती. याप्रकरणी पुढील तपास नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या महिला सहायक पोलिस निरिक्षक हांडोरे या करीत आहेत.

Web Title: A case of rape has been registered against the Jhumka Wali Poran fame actor in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.