चांदवड घाटात बसने अचानक घेतला पेट; तातडीने बस थांबाविल्यामुळे प्रवाशांचा वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 13:13 IST2023-01-18T13:11:12+5:302023-01-18T13:13:27+5:30
बस मालेगाव येथून नाशिकला जात असताना चांदवड जवळ मुंबई आग्रा महामार्गवर घटना घडली.

चांदवड घाटात बसने अचानक घेतला पेट; तातडीने बस थांबाविल्यामुळे प्रवाशांचा वाचला जीव
- अतुल शेवाळे
मालेगाव (नाशिक)- शहादा -मुंबई बस नाशिककडे जात असताना चांदवड घाटात बसने अचानक पेट घेतला. आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला .चांदवड अग्निशमन दल सोमा कंपनीच्या बंबाने आग विझवली. सामाजिक कार्यकर्त्यांनी घटना घटनास्थळी धाव घेतली होती.
बस मालेगाव येथून नाशिकला जात असताना चांदवड जवळ मुंबई आग्रा महामार्गवर घटना घडली. ड्रायव्हरने समयसूचकता दाखवून तातडीने बस थांबाविल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. टोल कंपनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत एसटी जळून खाक झाली. या घटनेमुळे महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती.