दिंडोरी तालुक्यात खरीपाची ९८ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:15 IST2020-09-09T23:18:41+5:302020-09-10T01:15:29+5:30
दिंडोरी : तालुक्यातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्राच्या ९८ टक्के पेरण्या पुर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी दिली.

दिंडोरी तालुक्यात खरीपाची ९८ टक्के पेरणी
दिंडोरी : तालुक्यातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्राच्या ९८ टक्के पेरण्या पुर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी दिली.
कोरोनामुळे रब्बी हंगामातील खडतर प्रवास करून बळीराजाने खरीप हंगामासाठी कंबर कसली होती. खरीपातील पिके घेतांना कसरत करावी लागली आहे. हतबल शेतकरी वर्गाला कृषी विभागाने मार्गदर्शनपर आधार देऊन हंगामासाठी सज्ज केले. त्यासाठी सोयाबीन पासून ते मका पिकापर्यंत तसेच टमाटे पासून ते नगदी पिकाबाबत चर्चा, कृषी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातुन शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले. सोयाबीन बाबत शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरणसाठी उद्युक्त करण्यात कृषी विभागाला यश आले. पावसाने लहरीपणा दाखवत आधी दडी मारली. आॅगष्ट महिन्यात बºयापैकी पाऊस पडला. बियाणे पेरणी नंतर उगवण क्षमता होत असतांना पावसाने दडी मारल्याने आता खरीप हंगामाचे उद्दिष्टे पुर्ण होते की नाही व दुबार पेरणीचे संकट आ वासून उभे राहिले असतांना पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. मात्र सोयाबीन, टमाटा पिकावर थोड्याफार प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाला. वातावरणातील बदलाचा टमाटा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.