शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’

By अझहर शेख | Published: June 03, 2023 4:05 PM

धनगरांच्या घरात प्रचंड मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे.

नाशिक : महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.२) रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घाडगे यांच्या आदेशान्वये पथकाने त्यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेताना ८५ लाखांची रोकड व ३२ तोळ्यांचे ‘धन’ बघून पथकही अवाक् झाले. धनगरांच्या घरात प्रचंड मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे.

नाशिक शहरासह जिल्हा सध्या लाचखोर सरकारी लोकसेवकांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. वर्ग-३ किंवा ४ सह आता चक्क वर्ग-१ व २चे अधिकारीसुद्धा लाच घेताना पथकाच्या हाती लागत आहे. काही दिवसांपुर्वीच जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे यांना ३० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. या आतापर्यंत मोठ्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असताना मनपाच्या महिला शिक्षणाधिकारी संशयित सुनीता धनगर यांनीही ५० हजारांची लाच स्वीकारली असता पथकाने त्यांना रंगेहात जाळ्यात घेतले. या दोन मोठ्या कारवायाने शहरात लाचखोर लोकसेवक अधिकाऱ्यांविषयी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, वालावलकर यांनी धनगरांच्या घराची झडतीचे आदेश दिले असता पथकाने त्यांचे उंटवाडी येथील ‘रचित सनशाइन’ नावाच्या घरात धडक दिली. घराची झाडाझडती घेताना तब्बल ८५लाखांची रोकड घरात आढळून आली आहे. धनगरांनी इतक्या मोठ्या संख्येने नोटांचे बंडल घरात साठवून ठेवल्याचे बघितल्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

यंत्रांद्वारे काही तास नोटांची मोजदाद -साठविलेल्या नोटा मोजण्यासाठी एकापेक्षा जास्त यंत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला आणावी लागली. यंत्रांच्या सहाय्याने काही तास नोटांची मोजदाद सुरू होती. यानंतर हा आकडा समोर आला. त्याचप्रमाणे ३२तोळ्यांचे सोन्याचांदीचे दागिणेसुद्धा घरात आढळले आहेत. यासह आडगाव शिवारात मोकळा भुखंड आणि शहरात याव्यतिरिक्त आणखी दोन फ्लॅटदेखील धनगरांच्या नावाने असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारEducationशिक्षणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका