ओझर परिसरात ७४ नवे बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 01:02 IST2021-04-07T22:02:37+5:302021-04-08T01:02:58+5:30

ओझरटाऊनशिप : ओझरसह टाऊनशिप परिसरात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी (दि.७) ७४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे ओझर सह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २३२८ झाली आहे.

74 newly infected patients in Ojhar area | ओझर परिसरात ७४ नवे बाधित रुग्ण

ओझर परिसरात ७४ नवे बाधित रुग्ण

ठळक मुद्देआतापर्यंत परिसरात ३८ जणांचा मृत्यू

ओझरटाऊनशिप : ओझरसह टाऊनशिप परिसरात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी (दि.७) ७४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे ओझर सह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २३२८ झाली आहे.

आतापर्यंत परिसरात ३८ जणांचा मृत्यू झाला असून १६५५ रुग्ण बरे झाले आहेत तर ६३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ओझर परिसरात रोज बाधित रुग्णांची सख्या वाढतच आहे. रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली करोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सद्यस्थितीत ६३५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील ५२४ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या ११५६ झाली असुन आता अँक्टिव्ह झोन ५४० असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली

Web Title: 74 newly infected patients in Ojhar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.