'मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी 60 एकर भूखंड देणार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 15:48 IST2018-07-28T15:47:49+5:302018-07-28T15:48:55+5:30
सकल मराठा समाजाच्यावतीने भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरावर नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे बोंबाबोंब ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांची आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांनी भेट घेतली.

'मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी 60 एकर भूखंड देणार'
नाशिक : सकल मराठा समाजाच्यावतीने भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरावर नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे बोंबाबोंब ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांची आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी व भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी भेट घेतली. त्यावेळी मराठा समाजाच्या वसतिगृहासाठी 60 एकर भूखंड देण्याची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची दखल घेत मराठा समाजाच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उपयुक्त असे वसतिगृह उभारण्यासाठी मनपा हद्दीतील महानगरपालिकेच्या ताब्यातील 60 एकर भूखंड देण्याची घोषणा करण्यात आली. महासभेत ठराव करुन सकल मराठा समाजाला हा भूखंड देण्याच आश्वासन यावेळी त्यांनी दिले. सकल मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांचे निवेदनही शासनापर्यंत पोहोविणार असल्याचे आमदार सानप यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाचेच हे यश असल्याचे क्रांती मोर्चातील मराठा बांधवांनी म्हटले आहे.