जिल्ह्यात कोरोनाचे ६ बळी; १६४ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:21 IST2020-07-11T00:05:24+5:302020-07-11T00:21:53+5:30
जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शुक्रवारी (दि. १०) कोरोनाने सहा जणांचा बळी घेतल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. याशिवाय दिवसभरात १६४ नवीन बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, शुक्रवारी बाधित आढळल्याच्या प्रमाणात काहीशी घट झाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात कोरोनाचे ६ बळी; १६४ बाधित
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शुक्रवारी (दि. १०) कोरोनाने सहा जणांचा बळी घेतल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. याशिवाय दिवसभरात १६४ नवीन बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, शुक्रवारी बाधित आढळल्याच्या प्रमाणात काहीशी घट झाल्याचे दिसून आले.
गेल्या महिन्यापासून शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून दररोज २०० पेक्षा जास्त बाधित आढळून येत असल्याने चिंता कायम आहे. बाधितांच्या प्रमाणात आज काहीशी घट झाल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतात नाशिक शहरातील पाच तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकाचा समावेश आहे.
बाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी सहा बळींमुळे जिल्ह्याची आतापर्यंतची कोरोना बळींची संख्या ३१२ वर पोहोचल्यामुळे प्रशासनस्तरावर चिंता कायम आहे.
जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या अहवालांचा आकडाही तब्बल ९०० वर पोहोचला आहे.