दुगाव येथे ५३ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:33 IST2019-03-17T01:32:40+5:302019-03-17T01:33:52+5:30

चांदवड : तालुक्यातील दुगाव गावात मोबाइल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ५३ हजार ३५० रुपयांचा माल चोरून नेला.

53 thousand stolen at Dugaon | दुगाव येथे ५३ हजारांची चोरी

दुगाव येथे ५३ हजारांची चोरी

चांदवड : तालुक्यातील दुगाव गावात संत जनार्दन स्वामी कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील गाळा नंबर ६ मधील अकुंश मुरलीधर खैरे यांच्या मोबाइल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाइलच्या बॅटऱ्या, हातातील घड्याळे, हेडफोन, सात हजार रुपये रोख, स्पीकर पॉवर बॅक असा एकूण ५३ हजार ३५० रुपयांचा माल चोरून नेला.
याबाबत चांदवड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक
तपास हवालदार कैलास जगताप करीत आहेत.

Web Title: 53 thousand stolen at Dugaon