शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळ विकासासाठी ५० लाखांचा निधी

By admin | Updated: January 9, 2017 00:44 IST

हतगड : महाराष्ट्र वनविभागाने गुजरात राज्याच्या कामाचा आदर्श घ्यावा

 कनाशी : सुरगाणा तालुक्यातील हतगड पर्यटनस्थळासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून अविकसित असलेल्या हतगड किल्ल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास खात्यामार्फत संवर्धन करण्यात येणार आहे. या ठिकाणी आकर्षक पर्यटनस्थळ उभारण्यात येणार असून, यासाठी शासनाकडून ५० लाख रुपये निधी कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती हतगड यांच्या खात्यावर प्राप्त झाला आहे.
कनाशी वनपरिक्षेत्र कार्यकक्षेतील हतगड किल्ला हा पर्यटनस्थळ होण्यासाठी वनसंरक्षक अरविंद पाटील व मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकासाच्या बैठकीत आकर्षक पर्यटनस्थळ तयार करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील हतगड किल्ल्याची निवड झाली आहे. त्यानुसार किल्ल्याचा पुरातत्व विभागमार्फत विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये किल्ल्यावर असलेल्या पुरातत्व वस्तू, प्रेक्षणीय ठिकाणे, धान्य गुदामे, तबेले यांची आजची स्थिती याबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. किल्ल्याची विकासकामे होणार असल्याची माहिती अमोल आढे यांनी दिली. किल्ल्यावरती जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला पाइप रेलिंग, किल्ल्याच्या पायऱ्या दुरुस्ती, दरड प्रतिबंधक जाळ्या, मजुरांसाठी निवारा शेड, व्यवस्थापन विभागासाठी दोन खोल्या, मुख्य प्रवेशद्वार, संपूर्ण किल्ल्याच्या परिसराला लोखंडी संरक्षक जाळ्या व डागडुजी आदि विकासकामे गेल्या दोन वर्षांत झाली आहेत. या किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. किल्ल्याच्या निम्म्या भागापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहने जातात. विकासकामांमुळे पर्यटकांना किल्ल्यावर लवकरात लवकर पोहोचणे शक्य होणार असून, वेळ व श्रम वाचणार आहेत. किल्ला संवर्धन व विकास कार्यक्रमांतर्गत हे आकर्षक पर्यटनस्थळ होणार असून, त्याबाबत वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. (वार्ताहर)