लासलगाव परिसरात ७०८ मि. मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:29 IST2019-10-24T00:27:50+5:302019-10-24T00:29:32+5:30
लासलगाव : परिसराला मंगळवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. मंगळवारी १ इंच २७ सेंटीमीटर पाऊस झाल्याची नोंद लासलगाव बाजार समितीच्या पर्जन्यमापकावर झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. आतापर्यंत परिसरात आतापर्यंत ७०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

लासलगाव परिसरात ७०८ मि. मी. पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : परिसराला मंगळवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. मंगळवारी १ इंच २७ सेंटीमीटर पाऊस झाल्याची नोंद लासलगाव बाजार समितीच्या पर्जन्यमापकावर झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. आतापर्यंत परिसरात आतापर्यंत ७०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गणेशनगर भागातील ओहोळ सुमारे सात ते आठ तास वाहत होता. शास्त्रीनगर बंधारा ओसंडून वाहत होता. शिवनदी प्रथमच खळखळली. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी नदीपात्रात कचरा फेकुन शिवनदीची कचराकुंडी केली आहे. या पावसाने सर्व कचरा वाहून गेला आहे. मंगळवारच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. सुमारे चार ते पाच तास जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. लासलगाव शहरात कोटमगाव रोड, लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय परिसर या भागातील दुकानांत पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. अमृतनगर, सुमतीनगर, विद्यानगर, गणेशनगर या भागात जाणाऱ्या रस्त्यांवर ओहोळाला पाणी आल्याने हा रस्ता बंद पडला होता, तर शास्त्रीनगर बंधाºयात पाणी आल्याने हा बंधारा ओसंडून वाहत आहे. कांदा, टमाटा, मका, सोयाबीन आणि बाजरी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने बळीराजा धास्तावला आहे.