शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

४९२ लेटलतिफांना नोटिसा बजावण्याची कारवाई

By admin | Updated: November 18, 2014 01:03 IST

४९२ लेटलतिफांना नोटिसा बजावण्याची कारवाई

नाशिक : गेल्या शनिवारी सापडलेल्या ४९२ लेटलतिफांना नोटिसा बजावण्याची कारवाई पूर्ण होत नाही तोच सोमवारी २९२ कर्मचारी पुन्हा वेळेत हजर न झाल्याने त्यांना पालिका प्रशासनाने दणका दिला आहे. या सर्वांना कारणे दाखवा अन्यथा वेतनवाढ बंद अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी तर सबबी सांगणे सुरू केले आहे.महापालिकेच्या मुख्यालयासह बहुतांशी कार्यालये म्हणजे धर्मशाळा झाल्या असून, कर्मचारी आणि अधिकारी केव्हाही येत-जात असल्याने पालिकेच्या कामकाजाचे वेळापत्रकच विस्कळीत होते. पालिकेचे नूतन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार गेडाम यांनी गेल्या शनिवारी (दि.१५) मुख्यालय, तसेच सर्व विभागीय कार्यालयात अधिकारी पाठवले आणि साडेदहा वाजता सर्व हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले. कामावर येण्याची नियोजित वेळ दहा वाजेची असतानादेखील साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयात न येणाऱ्या ४९२ लेटलतिफांना नोटिसा पाठवून खुलासा मागविण्यात आला. त्यासाठी सोमवारपर्यंतची अंतिम मुदत होती. दरम्यान, सोमवारी सकाळीही आयुक्तांनी पुन्हा तोच पॅटर्न वापरला. त्यानुसार मुख्यालयात उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, नाशिक पश्चिममध्ये उपआयुक्त विजय पगार, नाशिकरोड विभागात दत्तात्रेय गोतिसे, सातपूरमध्ये सहायक आयुक्त चेतना केरुरे, पूर्व विभागात वसुधा कुरणावळ, सिडको विभागात नितीन नेर, पंचवटीत एस. डी. वाडेकर यांनी साडेदहा वाजेनंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यात महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथील मुख्यालयात सर्वाधिक ६८, त्यानंतर सिडको विभागात ६०, पंचवटी ४४, नाशिकरोड ३९, पूर्व विभाग ३७, सातपूर २१ याप्रमाणे कर्मचारी गैरहजर आढळले त्या सर्वांना नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर बडगा उगारण्याच्या आयुक्तांच्या कारवाईचे सामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र यापूर्वीही अशी कारवाई झाल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’च राहिल्याने यावेळी काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)