नाशिक : ‘मैं दृढ प्रतिज्ञा करता हूं की, कानून द्वारा निश्चित किये गये भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहूंगा, और मैं अपने कर्तव्य के अनुसार ईमानदारी और सच्चे मन से देशसेवा करूंगा...’ अशी शपथ आत्मविश्वासाने घेत भारतीय तोफखान्याच्या ४१२ जवानांनी (गनर) सशस्त्र संचलन करत स्वत:ला देशसेवेसाठी सिद्ध केले.निमित्त होते, नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्याचे. शनिवारी (दि.७) केंद्राच्या संचलन मैदानावर वरूणराजाच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा लष्करी थाटात पार पडला. ४४ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित मुख्य अतिथी तथा वरिष्ठ अधिकारी सेना पदक विजेते मेजर जनरल संजय थापा, कमान्डंट ब्रिगेडियर जे.एस.गोराया यांना मानवंदना दिली. युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणा-या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे कार्यान्वित आहे. शपथविधी सोहळ्याचे समीक्षण मेजर जनरल संजय थापा यांनी केले.केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी थापा म्हणाले, आपल्या पूर्ण कारकिर्दीत आजचा दिवस सदैव स्मरणात ठेवावा.
४१२ जवान तोफखान्यात : मैं सच्चे मन से देशसेवा करूंगा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 18:18 IST
तोफखाना केंद्राचे ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. ‘तोपची’च्या या तुकडीचा मला गर्व आहे. मला विश्वास आहे....
४१२ जवान तोफखान्यात : मैं सच्चे मन से देशसेवा करूंगा...
ठळक मुद्देमाता-पित्यांना ‘गौरव पदक’‘मैं दृढ प्रतिज्ञा करता हूं की...