नासर्डीतून काढला ४०० किलो कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 01:10 IST2021-01-18T01:09:50+5:302021-01-18T01:10:16+5:30
गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नेहमीच चर्चा होते. मात्रउपनद्यांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असते. नासर्डी नदी, तर अस्वच्छतेचे आणि डासांचे माहेरघर आहेत. त्यामुळे महापालिकेने रविवारचा (दि.१७) मुहूर्त साधून केवळ उंटवाडी पुलाजवळ स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत पुलाजवळील एकाच भागातून तब्बल ४०० किलो कचरा उचलण्यात आला.

नासर्डीतून काढला ४०० किलो कचरा
नाशिक : गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नेहमीच चर्चा होते. मात्रउपनद्यांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असते. नासर्डी नदी, तर अस्वच्छतेचे आणि डासांचे माहेरघर आहेत. त्यामुळे महापालिकेने रविवारचा (दि.१७) मुहूर्त साधून केवळ उंटवाडी पुलाजवळ स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत पुलाजवळील एकाच भागातून तब्बल ४०० किलो कचरा उचलण्यात आला.
उंटवाडीजवळील सिटी सेंटर मॉलच्या भागात ही मोहीम राबवण्यात आली. मॉलच्या मागील मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नदी पात्रात कचरा टाकला जातो. विशेषत: भल्या सकाळी किंवा रात्री अशाप्रकारे काही बेजबाबदार नागरीक या नदीपात्रात कचरा टाकत असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेने याठिकाणी पाळत ठेवून काही नागरिकांना दंडदेखील केला आहे. मुळातच ही नदी बारमाही नसल्याने या पात्रात टाकलेला कचरा जैसे पडून राहतो त्यामुळे महापालिकेने रविवारी (दि.१७) मोहीम राबविल्याचे घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले. सध्या केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाची तयारी सुरू असून त्या अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. नदीपात्र स्वच्छ राहावे यासाठी मोहीम राबविण्यात येणार असून कचरा टाकणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे, असे डॉ. कुटे यांनी सांगितले.