व्यावसायिकाकडून ४० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:35 IST2019-03-17T00:34:28+5:302019-03-17T00:35:28+5:30
बांधकाम व्यावसायिकाने इमारत आपल्या मालकीची आहे असे भासवून अधिकार नसताना फ्लॅटचे दस्त बनवून ४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिकाकडून ४० लाखांची फसवणूक
नाशिकरोड : बांधकाम व्यावसायिकाने इमारत आपल्या मालकीची आहे असे भासवून अधिकार नसताना फ्लॅटचे दस्त बनवून ४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ग्रॅण्टरोड येथील सुरेश महादेव गंधास यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मार्च २०११ मध्ये देवळाली शिवारातील जयभवानीरोड येथील साईदर्शन अपार्टमेंटमधील फ्लॅट व साईलीला अपार्टमेंट ही आपल्या मालकीची आहे असे भासवून बांधकाम व्यावसायिक नीलेश काळे, विजय काळे रा. नाशिक यांनी गंधास यांना दस्त बनवून दिले. साईलीला अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २च्या खरेदीपोटी वेळोवेळी रोख व चेक स्वरूपात ३० लाख रुपये घेतले.