शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४ ठार : देवळ्याजवळ भावडबारी घाटात ट्रॅक्टर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 14:46 IST

शेती बघण्यासाठी देवळ्याला जात असताना देवळ्याला जात असताना भावडबारी घाटात काळाने त्यांच्यावर झडप घातली. मुलांमध्ये लहान मुलासह महिला, पुरूषाचा समावेश असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देवळणावर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली

नाशिक : नवीन शेतजमीन खरेदी केल्याने कुटुंब ते बघण्यासाठी ट्रॅक्टरमधून निघाले होते. जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भावडबारी घाटात ट्रॅक्टर अचानकपणे उलटल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची अवस्थाही बघवत नव्हती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृतांमध्ये सर्व चांदवड तालुक्यातीलशेलुपुरी गावातील रहिवाशी असल्याचे बोलले जात आहे. शेती बघण्यासाठी देवळ्याला जात असताना भावडबारी घाटात काळाने त्यांच्यावर झडप घातली. मुलांमध्ये लहान मुलासह महिला, पुरूषाचा समावेश असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, चांदवड तालुक्यातील पुरी गावात राहणारे एकाच कुटुंबातील नऊ शनिवारी (दि.६) सकाळी टॅक्ट्ररच्या ट्रॉलीमध्ये बसून देवळ्याच्या प्र्रवासाला निघाले होते. हा ट्रॅक्टर विंचूर प्रकाश मार्गावर असलेल्या भावडबारी घाटातून देवळ्याकडे जात होता. घाटातील अखेरच्या टप्प्यातील अपघाती वळणावर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर उतारावरच उलटला. यामुळे ट्रॅक्टरचे सर्व भाग सुटे तर झालेच मात्र जीवीतहानी सुध्दा झाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह व जखमींना तत्काळ देवळा व मालेगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा देवळा आणि एका शेतमजूराचा मालेगाव रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण अपघाताने चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये दोन पुरूष एक मुलगा व महिलेचा समावेश आहे. या अपघातात ट्रॅक्टरमधील पाच ते सात लोक जखमी झाले असून त्यांच्यावर देवळा ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसFarmerशेतकरी