धावताना कोसळून ३७ वर्षीय सैनिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 01:13 IST2022-02-21T01:13:03+5:302022-02-21T01:13:24+5:30

देवळाली कॅम्प लष्करी हद्दीतील शिंगवे गावाजवळ नियमितपणे धावण्याचा सराव करताना अचानकपणे हवालदार हिमांशु शेखर जाना (३७,रा. १८६२ एल.टी रेजिमेंट,वडनेररोड) शनिवारी (दि.१९) सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास रस्त्यावर कोसळले

37-year-old soldier dies after falling while running | धावताना कोसळून ३७ वर्षीय सैनिकाचा मृत्यू

धावताना कोसळून ३७ वर्षीय सैनिकाचा मृत्यू

देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प लष्करी हद्दीतील शिंगवे गावाजवळ नियमितपणे धावण्याचा सराव करताना अचानकपणे हवालदार हिमांशु शेखर जाना (३७,रा. १८६२ एल.टी रेजिमेंट,वडनेररोड) शनिवारी (दि.१९) सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास रस्त्यावर कोसळले. यावेळी त्यांना त्यांच्या साथीदारांनी तात्काळ सैनिकी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. नेहमीप्रामणे शनिवारी सकाळी जाना हे त्यांच्या काही साथीदारांसमवेत धावण्याचा नियमित सराव करत होते. लष्करी हद्दीतून धावत असताना ते अचानकपणे खाली कोसळले. यावेळी लान्सनायक सितेंद्र आहेर, राम शर्मा यांनी तात्काळ जाना यांना उचलून जवळच्या सैनिकी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टर मेजर विकास कुमार यांनी त्यांना तपासले असता उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: 37-year-old soldier dies after falling while running