शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

३३ हजार गरजूंना मदतीचा हात

By admin | Updated: March 2, 2016 23:40 IST

सेवाव्रत : राज्याच्या शासकीय रुग्णवाहिका सेवेचे तिसऱ्या वर्षांत यशस्वी पदार्पण

 अझहर शेख नाशिकअपघात, पक्षाघात, हृदयविकारचा झटका, सर्पदंश अशा संकटप्रसंगी गरजूंना अत्यावश्यक सेवा मोफत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी ‘विशेष रुग्णवाहिका’ रस्त्यावर उतरविल्या. याअंतर्गत शासनाच्या महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिकांनी (१०८ एमईएमएस) दोन वर्षांत जिल्ह्यात ३३ हजार ६६ गरजूंना मदतीचा हात दिला आहे. एमईएमएसच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेने तिसऱ्या वर्षांत यशस्वी पदार्पण केले असून, जिल्ह्यात एकूण ४६ रुग्णवाहिकांद्वारे वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्य शासनाने आपत्कालीन वैद्यकीय सेवा ‘१०८’ या टोल फ्री क्रमांकावर २०१४ साली मोफत उपलब्ध करून दिली. डॉक्टर, अनुभवी चालक, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ९३७ रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. जिल्ह्यात एकूण ४६ रुग्णवाहिकांमार्फत अत्यावश्यक सेवा पुरविली जात आहे. गरजूंनी ‘१०८’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधताच सुसज्ज अद्ययावत मदत कक्षातील प्रशिक्षित प्रतिनिधींकडून घटनास्थळाची माहिती घेतली जाते. त्यानंतर तत्काळ संबंधित क्रमांकावर रुग्णवाहिकेचा क्रमांकासह त्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा लघुसंदेशही पाठविला जातो, जेणेकरून डॉक्टरसोबत संबंधित संपर्क साधून रुग्णवाहिकेबाबतची माहिती घेऊ शकतील. महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातून कोणत्याही ‘नेटवर्क’च्या मार्फत ‘१०८’ क्रमांकाशी संपर्क साधता येतो.