शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

थकीत पाणीपट्टीबाबत ३३ हजार नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:51 AM

अंदाजपत्रकातील कामांची तरतूद आणि नगरसेवकांच्या कामांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे महापालिकेने कर थकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टीची ४३ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले

नाशिक : अंदाजपत्रकातील कामांची तरतूद आणि नगरसेवकांच्या कामांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे महापालिकेने कर थकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टीची ४३ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले असून, पट्टी थकविणाºया ३३ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत, तर नोटिसांना न जुमानणाऱ्यांच्या नळजोडण्या तोडण्याची कारवाईदेखील तीव्र केली आहे. शहरातील २ हजार ३६२ नळजोडणीधारकांचे नळ कनेक्शन तोडले आहे.महापालिकेच्या वतीने दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यानंतर करवसुलीची कारवाई सुरू करण्यात येते. परंतु यंदा नवे आर्थिक वर्ष सुरू होतानाच महापालिकेने वसुलीवर भर दिला आहे. गेल्या दीड दोन वर्षांत नगरसेवकांच्या प्रभागात साधी साधी कामे झालेली नाहीत. त्यामुळे त्यांचा दबाव प्रशासनावर वाढत आहे. विशेषत: नगरसेवक निधीतील कामे करण्यासाठी नगरसेवक आग्रही आहेत, परंतु ज्या पद्धतीने महसूल वसूल होईल त्याप्रमाणे निधीच्या उपलब्धतेनुसार नगरसेवकांची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे घरपट्टीच्या थकबाकीदारांच्या मिळकतींचे लिलाव करतानाच पाणीपट्टीची जवळपास ४३ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. थकबाकीदारांमध्ये नाशिकरोड आणि नाशिक पूर्व विभागातील थकबाकीदारांची संख्या सर्वाधिक आहे.महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी थकविणाºयांवर कारवाई करताना पाणीपट्टीच्या ३३ हजार ८७ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. या थकबादीराकांकडे ४३ कोटी ८३ लाखांची थकबाकी आहे. हे सर्व थकबाकीदार हे पाच हजार ते ५० हजारांपर्यंतच्या रकमेदरम्यानचे थकबाकीदार आहेत.सहाही विभागांत धडक मोहीममहापालिकेने नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत सहा विभागांत २३६२ नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. नाशिक पश्चिम विभागात ५५६ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल पंचवटी ५६६, नाशिक पूर्व विभागात ३६५, सातपूर ३३३, नाशिकरोड २३६, सिडको विभागात २६५ नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीTaxकर