डीलरशिपच्या बहाण्याने ३१ लाखांना आॅनलाइन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:19 IST2020-08-29T23:44:46+5:302020-08-30T01:19:01+5:30
नाशिक : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांना तब्बल ३१ लाख ७१ हजार रुपयांचा आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

डीलरशिपच्या बहाण्याने ३१ लाखांना आॅनलाइन गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांना तब्बल ३१ लाख ७१ हजार रुपयांचा आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
निफाड तालुक्यातील विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांनी दि. २४ जून २०२०पासून २१ आॅगस्ट २०२० या दरम्यान हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिपसाठी आॅनलाइन अर्ज भरला. राहुल शर्मा नावाच्या इसमाने खोट्या भ्रमणध्वनी नंबरवरून कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे त्यांना भासविले. फिर्यादी निखिल राऊत यांनी विविध बँकांच्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या नावाच्या बनावट खात्यावर वेगवेगळ्या प्रकारे आरटीजीएसद्वारे ३० लाख ७१ हजार ५०० रुपये भरले. मात्र यात आपली आॅनलाइन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची खोटी वेबसाइट बनवून डिस्ट्रिब्यूटरशिप देतो, असे सांगून फिर्यादीस कंपनीचे डिस्ट्रिब्यूटरशिपचे खोटे प्रमाणपत्र देऊन ३० लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या घटनांमध्ये साततत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी व्यवहार तपासूनच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.