शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत ३० आजी - माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात

By admin | Updated: January 10, 2017 01:17 IST

समोरासमोर निवडणूक लढविण्याची शक्यता

संदीप झिरवाळ पंचवटी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पंचवटी विभागातील प्रत्येक प्रभागात आजी-माजी असे एक ते दोन लोकप्रतिनिधी इच्छुक असल्याने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात जवळपास ३० आजी-माजी नगरसेवक उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही प्रभागांत दोन विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर ठाकणार आहेत.
पंचवटीत पूर्वी बारा प्रभाग होते. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य याप्रमाणे २४ लोकप्रतिनिधी होते. नवीन प्रभाग रचनेनुसार आता चार जागांचा एक प्रभाग झाल्याने पंचवटीत सदस्य संख्या पूर्वीप्रमाणेच २४ असून, सहा प्रभाग झाले आहे. पंचवटी विभागात सध्या शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस असे २४ नगरसेवक आहेत.
विद्यमान लोकप्रतिनिधींमध्ये सध्या विद्यमान महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, अ‍ॅड. राहुल ढिकले, रंजना भानसी, उद्धव निमसे, लता टिळे, ज्योती गांगुर्डे, समाधान जाधव, कविता कर्डक, विमल पाटील, मनीषा हेकरे, दामोदर मानकर, परशराम वाघेरे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, तर माजी नगरसेवकात अरुण पवार, अ‍ॅड. जे. टी. शिंदे, सुरेश खेताडे, उल्हास धनवटे, भगवान भोगे, शरद सानप, कमलेश बोडके, संजय बागुल, पुंडलिक खोडे, डॉ. जगन्नाथ तांदळे, रुक्मिणी कर्डक, हरिभाऊ लासुरे हेदेखिल निवडणुकीत नशीब आजमाविणार आहेत. विद्यमान नगरसेवकात गणेश चव्हाण हे पत्नीला, तर डॉ. विशाल घोलप हे आईला, मीना माळोदे यांचे पती, तर फुलावती बोडके यांच्याऐवजी त्यांचे पुत्र माजी नगरसेवक कमलेश बोडके, रूपाली गावंड यांचे पती हेमंत शेट्टी असे निवडणूक रिंगणात आहे. पंचवटीत जवळपास दीड डझनपेक्षा अधिक विद्यमान, तर डझनभर माजी नगरसेवक असे ३० आजी-माजी लोकप्रतिनिधी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.