शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

कुलगुरुपदासाठी जगन्नाथ दीक्षित,  मोहन खामगावकर यांच्यासह ३० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 1:28 AM

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू निवडीसाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत कुलगुरुपदासाठी देशभरातील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत तब्बल ३० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले

ठळक मुद्देचुरस : देशभरातील नामांकित वैद्यकीय संस्थांमधील दिग्गजांचा समावेश

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू निवडीसाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत कुलगुरुपदासाठी देशभरातील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत तब्बल ३० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले असून, यात विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर व मधुमेहमुक्त भारत अभियानाचे प्रणेते तथा औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचाही समावेश आहे.यात प्रामुख्याने पुण्यातील सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालयातील डॉ. सचिनकुमार पाटील,  नवीन पारगाव येथील तात्यासाहेब कोरे दंतवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य हरीश कुलकर्णी,  जयसिंगपूर येथील जेजेएमएएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद बुद्रुक, अमरावतीच्या डॉ. पी. डी. एम. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा. पुष्पा जुंगारे,  मुंबईतील सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालय तथा केईएम रुग्णालयाचे प्रा. हरीश पाठक, राष्ट्रीय जनआरोग्य व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत,  सैन्य रुग्णालयाचे वैद्यकीय सेवा महासंचालक लेफ्टनंट जनरल अशोक हुडा  यांच्यासह विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर व मधुमेहमुक्त भारत अभियानाचे प्रणेते तथा औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक जगन्नाथ दीक्षित, आदी  ३० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती वैद्यकीय विज्ञान संस्थेचे कक्ष अधिकारी संजीव ललवाणी यांनी  दिली आहे.निवड समितीने मागविले अर्जमाजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ नोव्हेंबर २०२० झालेल्या विद्यापीठ अधिकार मंडळाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या संयुक्त बैठकीत नूतन कुलगुरू निवडीसंदर्भात चर्चा झाल्यानंतर निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संंस्थेतर्फे २२ जानेवारी २०२१ रोजी संकेतस्थळ व प्रसिद्धीमाध्यमांत जाहिरातीद्वारे कुलगुरुपदासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवले होते. त्यानंतर ही मुदत ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. या कालावधीत देशभरातून कुलगुरुपदासाठी अर्ज  वैद्यकीय क्षेत्रातील ३० इच्छुक तज्ज्ञांनी अर्ज केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणHealthआरोग्यuniversityविद्यापीठ