शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

२२३ ग्रामसेवकांना २५ हजारांचा दंड

By admin | Updated: August 23, 2016 00:19 IST

दप्तर दिरंगाई : आयुक्तांनी केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचे आदेश

नाशिक : जिल्ह्णात २२३ ग्रामसेवकांनी दप्तर दिरंगाई केल्यामुळे त्यासंबंधित ग्रामपंचायतींचा हिशेब सादर न केल्याने पेसाचा निधी देण्यात येणार नाही. त्यामुळे दप्तर दिरंगाई करणाऱ्या २२३ ग्रामसेवकांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावण्याची विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्णातील २२३ ग्रामसेवकांनी बदली होऊनही दप्तरच सादर न केल्याने त्यांच्यावर प्रत्येकी २५ हजार दंडाची कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हा परिषदेकडे केल्याची माहिती उपआयुक्त सुखदेव बनकर यांनी आढावा बैठकीत दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील ग्रामपंचायत विभागाचा आढावा सादर करत असताना पेसा अंतर्गत थेट ग्रामपंचायतींना वितरित केलेल्या निधीतून शेकडो कामे अपूर्ण असल्याबाबत दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हिशेब सादर न केल्याने संपूर्ण ग्रामपंचायतीलाच या बेजबाबदार ग्रामसेवकांमुळे वेठीस धरण्याची वेळ आली आहे. ही बाब गंभीर असून संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई का प्रस्तावित केली नाही, अशी विचारणाही दादा भुसे यांनी ग्रामपंचायत विभागाला केली. त्यावर उपआयुक्त सुखदेव बनकर यांनी बदली होऊनही अशा दप्तर सादर न करणाऱ्या २२३ ग्रामसेवकांवर प्रत्येकी २५ हजाराच्या दंडाची कारवाई करावी, अशी शिफारस जिल्हा परिषदेला करण्यात आल्याकडे सुखदेव बनकर यांनी लक्ष वेधले. बदली होऊनही दप्तर सादर न करणाऱ्या आणि त्यामुळे संपूर्ण गावाला वेठीस धरणाऱ्या ग्रामसेवकांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच येत्या १५ दिवसांत आपल्याला अहवाल सादर करावा, असे आदेश दादा भुसे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांना दिले. (प्रतिनिधी)