शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

धरणात २४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 1:04 AM

नाशिक : जूनचे वीस दिवस पूर्ण होत असले तरी अद्याप शहर व परिसरात पावसाची दमदार सुरुवात झाली नसल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहे. मान्सूनपूर्व पावसासह मान्सूनच्या पावसानेही अद्याप नाशिककरांची निराशा केली. गंगापूर धरणामधील जलसाठाही कमी होऊ लागला आहे. पाण्याची पातळी २४ टक्क्यांपर्यंत येऊन पोहचली आहे.

ठळक मुद्देपावसाची ओढ बळीराजासह सर्वच चिंतातुर

नाशिक : जूनचे वीस दिवस पूर्ण होत असले तरी अद्याप शहर व परिसरात पावसाची दमदार सुरुवात झाली नसल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहे. मान्सूनपूर्व पावसासह मान्सूनच्या पावसानेही अद्याप नाशिककरांची निराशा केली. गंगापूर धरणामधील जलसाठाही कमी होऊ लागला आहे. पाण्याची पातळी २४ टक्क्यांपर्यंत येऊन पोहचली आहे.नाशिक शहरासह जिल्ह्याची तहान भागविणारा व गरज भासल्यास डाव्या-उजव्या कालव्यामार्फत अहमदनगर जिल्ह्याच्या रहाता, कोपरगाव आदी तालुक्यांपर्यंत पाणी पोहचविणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा अवघा एक हजार ३४१ दलघफू इतका शिल्लक राहिला आहे. धरणाचा एकूण क्षमता पाच हजार ६४० दलघफू इतक्या जलसाठ्याची आहे. धरणामधील पाण्याच्या पातळीत होणारी घट नाशिककरांची चिंता वाढविणारी असून, पावसाला समाधानकारक सुरुवात व्हावी, अशी आशा सर्वच बाळगून आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजाची शेतीची कामे खोळंबली असून, खरीप पिकांपूर्वीची मशागत रखडली आहे. विहिरीच्या पाण्यावर वाफे तयार करून तणनाशक फवारणीसाठी शेतवावर भिजविण्याची वेळ बळीराजावर आल्याचे चित्र शहराजवळील खेड्यांमध्ये पहावयास मिळत आहे.नाशिककरांची चिंता वाढविणारजुलै महिन्यापर्यंत नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे सांगितले जात असले तरी गंगापूर धरणातील घटणार जलसाठा नाशिककरांची चिंता वाढविणारा आहे. कारण अद्याप पावसाला दमदार अशी सुरुवात झालेली नाही. धरणाचे पाणलोट क्षेत्र सुमारे तीनशे किलोमीटरपर्यंत असले तरी उत्तर महाराष्टÑावर वरुणराजाची कृपादृष्टी अद्याप होत नसल्याने चिंता वाढली आहे.४ गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जूनमध्ये पर्जन्यमानाचे प्रमाण १०० मि.मी.पेक्षा अधिक घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अद्याप १७ जूनपर्यंत केवळ ४३ मि.मी. इतका पाऊस पडला आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी