शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

युवकाच्या खुनाचा २४ तासात छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:28 IST

वणी : कृष्णगाव शिवारात झालेल्या अनोळखी युवकाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात छडा लावला असून, व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वादातून युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिकच्या कोणार्कनगरमधील अक्षय ऊर्फ आशुतोष रामा चव्हाण (२१) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देकृष्णगाव शिवारातील घटना कुटुंब संपविण्याची धमकी आशुतोष याने दिल्याने दोघांनी आशुतोषचा काटा काढल्याचे निष्पन्न

वणी : कृष्णगाव शिवारात झालेल्या अनोळखी युवकाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात छडा लावला असून, व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वादातून युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिकच्या कोणार्कनगरमधील अक्षय ऊर्फ आशुतोष रामा चव्हाण (२१) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.दिनांक ४ फेब्रुवारी रोजी वणी -दिंडोरी रस्त्यावरील कृष्णगाव शिवारातील जलवाहिनीच्या लिक व्हॉल्व्हकडे अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. घटनास्थळावर आशुतोष रामा चव्हाण या नावाचा वाहन चालविण्याचा परवाना आढळून आला. तसेच मयताच्या हातावर अक्षय असे नाव होते.पोलीस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. वाहन चालविण्याच्या परवान्याच्या पत्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपर्क साधला असता मयत हा आशुतोष चव्हाण (रा. कोणार्कनगर, पंचकृष्ण लॉन्सजवळ, नाशिक) असल्याचे पुढे आले. आशुतोष सोबत घटनेच्या दिवशी दोन इसम हॉटेल जत्रा परिसरातून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून गेल्याची माहिती पथकाला मिळाली. जत्रा हॉटेल ते धात्रक फाटा परिसरात सापळा रचून रामदास ऊर्फ पिन्या दौलत पवार (२६) रा. निशांत गार्डन, धात्रक फाटा, नाशिक व किशोर बाळासाहेब पवार यांना ताब्यात घेतले.दिनांक ३ रोजी या दोघांनी आशुतोष याला कारमधे घेऊन दहावा मैल परिसरातील हॉटेलमधे जेवणासाठी गेले. तेथून ते कृष्णगाव शिवारात आले. व लघुशंकेसाठी घटनास्थळावर गेले असता आशुतोष यांच्याशी दोघांची बाचाबाची झाली. शिवीगाळ करण्यात आल्यानंतर दोघांनी आशुतोषला जमिनीवर पाडून दगडाने चेहरा व डोके ठेचून आशुतोष याचा खून संगनमताने करु न पुरावा नष्ट केल्याचे तपासात पुढे आले. दरम्यान रामदास पवार याने अक्षय उर्फ आशुतोष याच्याकडून व्याजाने पंधरा हजार रु पये उसने घेतले होते. पैशासाठी आशुतोष याने रामदासकडे तगादा लावला व पैसे दिले नाही तर कुटुंब संपविण्याची धमकी आशुतोष याने दिल्याने दोघांनी आशुतोषचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले.गुन्ह्यात वापरलेली एमएच१५ ई ई ०९०३ ही कारही जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी करीत आहेत.