खोडेनगरमध्ये घरफोडीत २१ हजारांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:37 IST2019-01-29T00:36:58+5:302019-01-29T00:37:31+5:30
नाशिक : पखालरोडवरील खोडेनगर परिसरात असलेल्या हरिस्नेह अपार्टमेंटमध्ये राहणारे रत्नाकर महाराज यांच्या बंद असलेल्या सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी २१ ...

खोडेनगरमध्ये घरफोडीत २१ हजारांचे दागिने लंपास
नाशिक : पखालरोडवरील खोडेनगर परिसरात असलेल्या हरिस्नेह अपार्टमेंटमध्ये राहणारे रत्नाकर महाराज यांच्या बंद असलेल्या सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी २१ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
रत्नाकर महाराज गाणगापूर येथे गेले असता त्यांच्या बंद सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सोने-चांदीचे प्रत्येकी एक नाणे लंपास केल्याची घटना रविवारी (दि.२७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्रदीप धर्मा उगराणी (२८, रा. विहितगाव) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने एक तोळे वजनाचे सोन्याचे नाणे आणि दहा ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे असा २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.