चांदवडला कोरोनाचे दोन दिवसात १९० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:36 IST2021-04-20T22:50:35+5:302021-04-21T00:36:52+5:30
चांदवड : शहरासह तालुक्यात कोरोनाचे दोन दिवसात १९० नवीन रुग्ण आढळून आले. येथे दि. १८ एप्रिल रोजी ११२ पैकी ७६ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दि.१९ एप्रिल रोजी ४९२ पैकी ११४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दोन दिवसात रुग्णसंख्या १९० वर पोहोचली.

चांदवडला कोरोनाचे दोन दिवसात १९० रुग्ण
चांदवड : शहरासह तालुक्यात कोरोनाचे दोन दिवसात १९० नवीन रुग्ण आढळून आले. येथे दि. १८ एप्रिल रोजी ११२ पैकी ७६ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दि.१९ एप्रिल रोजी ४९२ पैकी ११४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दोन दिवसात रुग्णसंख्या १९० वर पोहोचली.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागात आहेत. उसवाड, वडनेरभैरव, धोंडगव्हाण, विटावे, वडाळीभोई ,आडगाव, मंगरुळ, तळवाडे, वाकी ब्रुदरुक, विटावे, आसरखेडे, आडगाव टप्पा, भरवीर, दरेगाव, दुगाव, गंगावे, गणूर, हरणुल, हिवरखेडे, काजीसांगवी, खडकओझर, मेसनखेडे, नारायणगाव, निमगव्हाण, निमोण, पाटे, राहुड, रायपूर, शेलू, तांगडी, शिंगवे, वाकी, तळेगावरोही, साळसाणो, जोपुळ, खडकजांब, मतेवाडी, पिंपळद, दरेगाव आदी एकूण १९० जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.