१९ दुचाकी चोरणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:16 AM2018-10-22T00:16:42+5:302018-10-22T00:17:00+5:30

मालेगाव : येथील किल्ला व छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १९ दुचाकी चोरणाºया सहा जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित हगवणे यांनी किल्ला पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

19 Theft of Two Wheeler Thieves | १९ दुचाकी चोरणाऱ्यांना अटक

मालेगावी किल्ला पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींसह दुचाकी चोर. समवेत पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, अधिकारी व कर्मचारी.

Next
ठळक मुद्देमालेगाव : नंबर प्लेट बदलताना सहा संशयित ताब्यात, एक फरार

मालेगाव : येथील किल्ला व छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १९ दुचाकी चोरणाºया सहा जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित हगवणे यांनी किल्ला पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
किल्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईत अतहर समसुद्दोहा अन्सारी व खालीद अख्तर निहाल अहमद दोघे रा. निहालपुरा यांना अटक करण्यात आली असून, त्यांचा साथीदार मोहंमद मुस्लीम हा फरार झाला आहे. त्यांच्या ताब्यातून १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर छावणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकनाथ मन्साराम अहिरे रा. कुकाणे, पुरुषोत्तम लक्ष्मण डांगचे रा. सानेगुरुजीनगर कॅम्प, मुकेश घनश्याम वºहाडे रा. मधुबन कॉलनी कलेक्टरपट्टा व शुभम संजय शिंदे रा. द्याने (ता. मालेगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे व पोलीस नाईक किशोर नेरकर यांना मिळालेल्या माहितीनुसार मालेगावी काही इसम एका गॅरेजमध्ये दुचाकीची नंबर प्लेट, चेसी नंबर, इंजिन नंबरमध्ये फेरफार करताना दिसले. पोलिसांनी सदर गॅरेजचा शोध घेऊन गॅरेज मालकाची भेट घेतली. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता दुचाकीचोर अजमल खा चौक येथे येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक पटारे, उपनिरीक्षक पाटील, डोखे, हवालदार अहिरे, पोलीस नाईक पाटील, नेरकर, देवराज भामरे, नाकोडे, पोलीस कर्मचारी चव्हाण, बागुल, निकाळे यांनी अजमल खा चौक येथे सापळा लावला.
दोन्ही दुचाकी चोर अजमल खा दुचाकीवर आले असता त्यांना पोलीस पथकाने पकडले. अधिक चौकशी केली असता मालेगावच्या कॅम्प, छावणी, शहर, पवारवाडी, आझादनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून १६ दुचाकींची चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या असून, आरोपींना अटक केली आहे.
पैकी त्यांचा साथीदार मोहंमद मुस्लीम हा फरार आहे. मोहंमद मुस्लीम हा फिटर असून चोरट्यांनी गॅरेजवर नेलेल्या दुचाकींना रंग देऊन नंबर प्लेट बदलून दुचाकी आकर्षक करून इंजिन नंबर बदलत असे. जून २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. ज्यांची दुचाकी चोरीला गेली असेल अशा नागरिकांनी कागदपत्र घेऊन ओळख पटवून दुचाकी घेऊन जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहर परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी पकडलेल्या दुचाकी चोरांमुळे आणखी दुचाकी चोºया उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.किल्ला-छावणी पोलिसांची कारवाई छावणी पोलीसांनी केलेल्या कारवाईत एकनाथ मन्साराम अहिरे रा. कुकाणे, पुरुषोत्तम लक्ष्मण डांगचे रा. सानेगुरुजीनगर कॅम्प, मुकेश घनश्याम वºहाडे रा. मधुबन कॉलनी, कलेक्टरपट्टा व शुभम संजय शिंदे रा. द्याने (ता. मालेगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
किल्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईत अतहर समसुद्दोहा अन्सारी व खालीद अख्तर निहाल अहमद दोघे रा. निहालपुरा यांना अटक करण्यात आली असून, त्यांचा साथीदार मोहंमद मुस्लीम हा फरार झाला आहे. त्यांच्या ताब्यातून १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

 

Web Title: 19 Theft of Two Wheeler Thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.