खंडणीखोर कृषी सहायक महिलेच्या घरात सापडले १९ लाखांचे घबाड; 'तो' अश्लील व्हिडिओ ‘फॉरेन्सिक’कडे

By अझहर शेख | Published: November 20, 2023 05:49 PM2023-11-20T17:49:11+5:302023-11-20T17:49:22+5:30

गुन्ह्याचा प्रकार व गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरूवात केली आहे.

19 Lakh money found in house of extorted agricultural assistant woman | खंडणीखोर कृषी सहायक महिलेच्या घरात सापडले १९ लाखांचे घबाड; 'तो' अश्लील व्हिडिओ ‘फॉरेन्सिक’कडे

खंडणीखोर कृषी सहायक महिलेच्या घरात सापडले १९ लाखांचे घबाड; 'तो' अश्लील व्हिडिओ ‘फॉरेन्सिक’कडे

नाशिक : निफाड येथील बीजगुणन केंद्रात कृषी सहायक म्हणून नोकरीला असलेली महिला व तिच्या मुलाने वीस कोटींची खंडणीची मागणी करत १कोटी रूपयांची खंडणी स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळाच्या एका कार्यकारी सदस्याकडून उकळल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली असून संशयित महिला सारिका सोनवणे हिच्या घर झडतीत पोलिसांना सोमवारी (दि.२०) आणखी १९ लाख रूपयांची रोकड हाती लागल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, तिचा मोबाइल डेटाचेही तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. आक्षेपार्ह तो व्हिडिओ फॉरेन्सिक’च्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४) यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याचे सांगून वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ करून सुमारे १ कोटी रुपयांची खंडणी संशयित मायलेकांनी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित महिला कृषी सहायक सारिका बापूराव सोनवणे (४२), मोहित बापूराव सोनवणे (२५) या दोघांना अटक केली आहे. येत्या बुधवारपर्यंत (दि.२२) जिल्हा व सत्र न्यायालयाने या मायलेकाला पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीत या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. गुन्ह्याचा प्रकार व गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्याकडून मिळणारी माहितीच्याअधारे पोलिस तपासाला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांच्या आर्थिक व्यवहारांची छाननीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. ज्या आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओचा आधारघेत संशयित महिला व तिच्या मुलाने धमकावून सुमारे १ कोटी ५ लाखांची खंडणी वसूली केली, तो व्हिडिओ फॉरेन्सिककडे सखोल तपासाकरिता पोलिसांनी सोपविला आहे. संशयित महिलेच्या मोबाइलचा डेटाची पडताळणी पोलिस करत आहेत.

Web Title: 19 Lakh money found in house of extorted agricultural assistant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक