शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१७० मिळकती अधांतरी

By admin | Updated: September 26, 2014 00:30 IST

न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष : शहरात नाममात्र दराने होतोय वापर

नाशिक : गंगापूररोडवर महापालिकेच्या मालकीची परंतु समर्थ महिला मंडळाच्या ताब्यात असलेली अभ्यासिका न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने सील केल्यानंतर आता अन्य १७० मिळकतींचे भवितव्य अधांतरी आहे. या मिळकती ज्यांच्या ताब्यात आहेत, अशा संस्थांना न्यायालयाचे समन्स बजावण्यास प्रारंभ झाला असून, येत्या ६ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे या मिळकतींविषयी न्यायालय काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या साडेसहाशे मिळकतींपैकी अनेक मिळकती या नाममात्र दराने आजी-माजी नगरसेवकांना किंवा त्यांच्या संस्थांना दिल्या असून, अशाच काही जागांसंदर्भात येथील अ‍ॅड. बाळासाहेब चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने गंगापूररोडवर भाजपा नगरसेवक सीमा हिरे यांच्या समर्थ महिला मंडळाच्या ताब्यात असलेली जागा ताब्यात घेण्याचे आदेश एप्रिल महिन्यात दिले होते. त्यानुसार महापालिकेकडे ताबा मिळाला असला, तरी यासंदर्भात उच्च न्यायालयात झालेली सुनावणी आणि त्यानंतर महापालिकेच्या प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिकेने बुधवारी सकाळी मिळकत सील केली. त्यानुसार प्रतिज्ञापत्र आणि संबंधित अभ्यासिकेची छायाचित्रे उच्च न्यायालयात सादर केली जाणार आहेत.दरम्यान, महापालिकेने ज्या १७१ मिळकतींची यादी उच्च न्यायालयात सादर केली होती, त्या मिळकती ज्या व्यक्ती आणि संस्थांच्या ताब्यात आहेत त्यांना समन्स बजावण्यास प्रारंभ झाला असून, पुढील सुनावणी ६ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे या मिळकतींविषयी न्यायालय काय आदेश देते याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे.