शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

१५ माकडांना डोंगरावर जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:55 AM

वैशाख वणव्याने पृथ्वीची काहिली होत असताना त्याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांनाही बसत आहे. डोंगरदऱ्यात रानमेव्यावर गुजराण करणाºया माकडांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तहानेने व्याकूळ झालेल्या १५ माकडांना पिण्याच्या पाण्यासाठी आडवाडीच्या आडूआई डोंगरावरील ऐतिहासिक खोल हौदात उतरण्याची वेळ आली.

सिन्नर : वैशाख वणव्याने पृथ्वीची काहिली होत असताना त्याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांनाही बसत आहे. डोंगरदऱ्यात रानमेव्यावर गुजराण करणाºया माकडांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तहानेने व्याकूळ झालेल्या १५ माकडांना पिण्याच्या पाण्यासाठी आडवाडीच्या आडूआई डोंगरावरील ऐतिहासिक खोल हौदात उतरण्याची वेळ आली. दुर्दैवाने त्यांना हौदातून बाहेर निघता न आल्याने त्यांना जलसमाधी मिळाली. पाण्यासाठी १५ माकडांवर जीव गमविण्याची वेळ आली. दुष्काळाने होरपळलेल्या सिन्नर तालुक्यात पाणीटंचाईने १५ माकडांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना आहे. या भागातील पाणवठे आटल्याने माकडांना पाणी पिण्यासाठी अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे या ऐतिहासिक हौदात पाणी पिण्यासाठी ही माकडे गेली असावीत, असा अंदाज आहे. पाणी पिण्यासाठी हौदात उतरल्यानंतर त्यांना बाहेर पडता न आल्याने त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.सोनांबे ग्रामपंचायतीचे सदस्य जर्नादन पवार हे मित्रासोबत रविवारी डोंगरावर मंदिरात गेल्यानंतर त्यांना हौदात लहान-मोठी १५ माकडे मृत्यूमुखी पडल्याचे दिसले. सर्व माकडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता व दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे पवार यांनी सोमवारी सिन्नरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात येऊन या घटनेची माहिती दिली. यावर्षी कधी नव्हे इतक्या टंचाईच्या झळा सिन्नर तालुक्याला बसत आहे. पूर्व भागात नेहमीच याचा फटका बसतो. मात्र यावर्षी पश्चिम पट्टयातही टंचाईचा फटका बसला असून त्यात १५ माकडांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.कोट‘आडूआई डोंगरावर मित्रासह फिरण्यासाठी गेलो होते. तेव्हा सदर प्रकार निदर्शनास आला. याठिकाणी हौदात पायºया करणे गरजेचे आहे. तसे पत्र आपण वनविभागाला दिले आहे. शासनाने याची दखल न घेतल्यास भविष्यात आणखी वन्यप्राण्यांचा यात जीव जावू शकतो. शासनाने या हौदात दगडी पायºया न केल्यास स्वखर्चाने आपण याठिकाणी पायºया बसवणार आहोत. जनार्दन पवार, ग्रामपंचायत सदस्य, सोनांबेबारा फुट खोल हौदाला पायºयाच नाहीत...तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सोनांबे-कोनांबे शिवारात आडवाडीजवळ आडूआईचा डोंगर आहे. या डोंगरावर देवीचे मंदिर असून, आणखी वर गेल्यानंतर १० ते १२ जुने ऐतिहासिक दगडी हौद आहे. या डोंगर परिसरात माकडांचा वावर असतो. या ऐतिहासिक हौदामधील पाणी पूर्णपणे आटून गेले असून, केवळ एका हौदात तीन ते चार फूट पाणी आहे. सुमारे १२ फूट खोल असलेल्या हौदाला वर येण्यासाठी पायºया नाहीत.आडूआईच्या डोंगरावर माकडांचा मृत्यू झाल्याचे समजते. वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे. याठिकाणी रेंज नसल्याने नेमका काय प्रकार घडला हे कर्मचारी आल्यानंतर समजेल.- प्रवीण सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिन्नर

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी