सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासमंडळावर मविप्रचे १५ सदस्य! 

By नामदेव भोर | Published: May 10, 2023 04:57 PM2023-05-10T16:57:45+5:302023-05-10T16:58:02+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने मविप्र प्रशासनाला पुढील पाचवर्षासाठी विद्यापीठ अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्यांविषयी माहिती दिली आहे.

15 members of Savitribai Phule Pune University Study Board! | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासमंडळावर मविप्रचे १५ सदस्य! 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासमंडळावर मविप्रचे १५ सदस्य! 

googlenewsNext

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या १५ सदस्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याविविध अभ्यासमंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे. यात संस्थेचे शिक्षणाधिकारी व सायखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे यांची रसायनशास्त्र अभ्यास मंडळावर, शिक्षणाधिकारी व के टी एच एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर डी दरेकर यांची बिझनेस लॉ अभ्यास मंडळावर निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्रशासनाने दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने मविप्र प्रशासनाला पुढील पाचवर्षासाठी विद्यापीठ अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्यांविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार आय एम आर टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत सूर्यवंशी यांची हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट अभ्यास मंडळावर, डॉ संजय गायकवाड यांची कॉम्प्युटर मॅनेजमेंट,डॉ. रुपाली महाले यांची फायनान्शीयल मॅनेजमेंट, डॉ. दिलीप शिंदे व डॉ. स्मिता पाकधाने यांची कॉस्ट अँड वर्क अकाऊंटींग , डॉ. प्रवीण रायते यांची प्रोडक्शन अँड ऑपरेशनल मॅनेजमेंट, डॉ. मुरलीधर भदाणे यांची एज्युकेशनल सायकोलॉजी, डॉ. राजेंद्र गुंजाळ यांची भूगोल, डॉ. प्रतिमा वाघ यांची सूक्ष्मजीवशास्र, डॉ.सुदर्शन कोकाटे यांची इन्जिनिअरिंग सायन्स ,डॉ अभिजित कुलकर्णी यांची इंन्स्ट्रमेंटेशन इन्जिनिअरिंग ,डॉ घनश्याम जाधव यांची फार्माकॉलॉजी, डॉ. अनिलकुमार आहेर यांची फार्माकॉग्नसी अभ्यासमंडळावर निवड झाली आहे.

सदर निवड ही पुढील पाच वर्षासाठी असणार आहे. दरम्यान, अभ्यास मंडळावर निवडी झालेल्या सर्व सदस्यांचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. विलास देशमुख, डॉ अशोक पिंगळे, डॉ नितीन जाधव, डॉ अजित मोरे, प्रा बी डी पाटील, प्रा दौलत जाधव यांनी सत्कार केला.

Web Title: 15 members of Savitribai Phule Pune University Study Board!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.