डेबिट कार्डच्या क्लोनिंगमधून दीड लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:09 IST2018-09-21T18:08:48+5:302018-09-21T18:09:52+5:30
नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये खाते असलेल्या वृद्धाच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून तयार केलेल्या कार्डच्या साहाय्याने संशयितांनी एक लाख ६० हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे़

डेबिट कार्डच्या क्लोनिंगमधून दीड लाखांची लूट
नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये खाते असलेल्या वृद्धाच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून तयार केलेल्या कार्डच्या साहाय्याने संशयितांनी एक लाख ६० हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार पेठेतील नवीन तांबट आळीतील रहिवासी शशिकांत कंसारा (७५) यांचे स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये खाते (११३९२०४८२५४) आहे़ १२ व १३ सप्टेंबर या कालावधित संशयितांनी कंसारा यांचे डेबिट कार्ड (६२२०१८००४३७००१४९९५८) चे क्लोनिंग तयार केले. तसेच या क्लोनिंग कार्डाचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून एक लाख ६० हजार रुपये काढून घेतले
याप्रकरणी कंसारा यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.