वसाकात सात ट्रकसह १५ ड्रायव्हर, क्लिनर अडकले, वाहतूकदारांचा प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:36 IST2019-02-10T17:22:24+5:302019-02-10T17:36:32+5:30

वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यानी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांनी थकित वेतनाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करीत कारखान्यातून साखर उचलण्यासाठी आलेले राज्यस्थानचे ७ ट्रकसह १५ ड्रायव्हर व क्लिनर यांना बंधीस्थ केल्याचा आरोप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंजू सिंघल व दिलीप सिंह बेनीवाल यांनी रविवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत केला आहे. 

15 drivers, cleaner stuck with seven trucks in Vasai, accused of passive administration | वसाकात सात ट्रकसह १५ ड्रायव्हर, क्लिनर अडकले, वाहतूकदारांचा प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप

वसाकात सात ट्रकसह १५ ड्रायव्हर, क्लिनर अडकले, वाहतूकदारांचा प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप

ठळक मुद्देवसाकामध्ये अडकले राज्यस्थानचे सात ट्रक ट्रकसोबत ड्रायव्हर क्लिनरही कारखान्यात अडकून कामगारांच्या आंदोलनामुळे वाहतूकदारांसमोर पेच

नाशिक : वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यानी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांनी थकित वेतनाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करीत कारखान्यातून साखर उचलण्यासाठी आलेले राज्यस्थानचे ७ ट्रकसह १५ ड्रायव्हर व क्लिनर यांना बंधीस्थ केल्याचा आरोप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंजू सिंघल व दिलीप सिंह बेनीवाल यांनी रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला आहे. 
थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे; परंतु कारखाना प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाºयांचे आंदोलन कायम आहे. जोपर्यंत मागण्यांवर चर्चा होत नाही, तोपर्यंत साखर व मळी कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे. त्यामुळे कारखान्यात २० जानेवारीला साखर उचलण्यासाठी आलेले राजस्थानचे ७ ट्रक ड्रायव्हर व क्लिनरसह कारखान्यात अडकून पडले आहे. हे ट्रक श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचे असून कंपनीने ट्रक व कामगारांना सोडविण्यासाठी  देवळा पोलीस फिर्याद दाखल करून मदत मागितली. परंतु, स्थानिक पोलिसांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने कंपनीने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएनच्या सहकार्याने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय देवरे यांनाही याप्रकरणी निवेदन देऊन मदतीची मागणी केली. परंतु,प्रशासानाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप वाहतूक दारांनी के सा आहे. यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे नाशिक  गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष शक्तीसिंह राज पुरोहीत, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सल्लागार प्रदीपसिंह चौधरी, हनुमान बेनीवाल, नाशिक जाट समाजाचे अध्यक्ष ईश्वर जाट, नरसिंह चौधरी, खेताराम चौधरी आदी उपस्थित होते. 

ट्रक, कामगारांना सोडावे
गेल्या २० ते २१ दिवसांपासून ट्रकसोबत ड्रायव्हर आणि क्लिनरही कारखान्यात अडकून पडले आहेत. यातील सात ट्रकमध्ये सुमारे २०० टनाहून अधिक माल भरलेला असून ट्रक एका जागेवर उभे आहे. त्यामुळे टायरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान ट्रकमधून साखर खाली करून रिकामे ट्रक आणि कामगारांना तरी सोडण्यात अशी मागणी ट्रक मालकांनी केली आहे. 

Web Title: 15 drivers, cleaner stuck with seven trucks in Vasai, accused of passive administration