दिंडोरी : तालुक्यात बिबट्याला पकडण्यासाठी १४ पिंजरे लावण्यात आले असून, बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही. त्याचा उपद्रव सुरूच असून, आंबेवणी येथे एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत कायम आहे.दिंडोरी तालुक्यातील परमोरी, वरखेझ, आंबेवणी, लखमापूर, पिंपळगाव केतकी, चिंचखेड, म्हेळुस्के परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. चार दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तीनवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन अधिकाºयांसह ७० वनरक्षकांचा ताफा, १४ पिंजरे, २२ ट्रॅप कॅमेरे व ड्रोन कॅमेरा लावूनही बिबट्या जेरबंद होत नसून, पाळीव प्राण्यांवर त्याचे हल्ले सुरूच असल्याने वनविभागापुढे आव्हान उभे राहिले आहे.तालुक्यात आजपर्यंत सार्थकसह तीन बालकांचा बिबट्यांनी बळी घेतला आहे, तर अनेकांची पाळीव प्राणी, वासरे, कुत्रे फस्त केले आहेत. कादवा कोलवन नदीकाठच्या गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून उपद्रव सुरू आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरे लावले असतानाही , बिबटे पिंजºयात न येता दिवसेंदिवस हल्ले करीत असल्याने, शेतकरी वर्ग, विद्यार्थी धास्तावले आहे. वनविभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवबल्ला यांनी सांगितले. यावेळी सहायक वनरक्षक राजेंद्र कापसे, सुधीर नेवासे, वनक्षेत्रपाल अधिकारी गणेश गांगुर्डे आदींसह चांदवड सुरगाणा व दिंडोरीचे वनधिकाºयांसह वनकर्मचारी वर्गाची फौजबिबट्याला पकडण्यासाठी सज्ज आहे.
१४ पिंजरे लावूनही बिबट्याचे हल्ले सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:00 IST